दिनांक 31 जुलै 2023 सोमवार

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 31 जुलै 2023
💠 वार - सोमवार
🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
 *_ या वर्षातील २१२ वा दिवस आहे_*  
•••••••••••••••••••••••••••••••• 
*_महत्त्वाच्या घटना:_*  
••••••••••••••••••••••••••••••             
*२००१:समाजात मूलभूत स्वरुपाची क्रांतिकारक जडणघडण करण्यासाठी झटणार्‍या व्यक्तींना देण्यात येणारा ’राजर्षी शाहूमहाराज समता पुरस्कार’ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर*
*२०००:वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे (CAT) डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार जाहीर*
*१९९२:सतारवादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर*
*१९९२:जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश*
*१९५६:कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला. या कसोटी सामन्यात त्याने १९ बळी घेतले.*
*१९५४:इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (मांऊंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.*
*१९३७:के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला ’वहाँ’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईतील ’मिनर्व्हा’ टॉकीजमधे प्रदर्शित झाला.*
*१८५६:न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्टचर्चची स्थापना*

  *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*  
•••••••••••••••••••••••••••••••••
*१९७२:जयराम  नारायण धोंगडे -- गझलकार, कवी*
*१९६९:डॉ.विनयकुमार वसंतराव दांदळे -- कवी,लेखक* 
*१९६९:सदाशिव शंकर शेंडे-- कवी*
*१९६८:ज्योती चौधरी-- लेखिका मुलाखतकार,निवेदिका*      
*१९६५:जे.के.रोलिंग – हॅरी पॉटर मुळे प्रसिद्ध झालेल्या इंग्लिश लेखिका*
*१९६०:सुवर्णा जाधव -- कवयित्री,लेखिका* 
*१९६०:सुमन जोसेफ गायकवाड-- लेखिका*
*१९५१:कविता कमलाकर पुणतांबेकर-- मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन करणाऱ्या कवयित्री लेखिका* 
*१९४७:मुमताज – प्रसिद्ध अभिनेत्री*
*१९४१:अमरसिंग चौधरी – गुजरातचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)*
*१९३८:प्राचार्य,प्रकाश लक्ष्मीकांत शेंडे- विचारवंत* 
*१९३५:शांताराम बळवंत मुजुमदार-- बहुराष्ट्रीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र सिम्बायोसिस सोसायटीचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती* 
*१९२५: श्रीकृष्ण गोपाळ काशीकर --लेखक(मृत्यू:५ जून २०१०)*
*१९१८:डॉ.श्रीधर भास्कर तथा ’दादासाहेब’ वर्णेकर – संस्कृत पंडित (मृत्यू: १० एप्रिल २०००)*
*१९१२:मिल्टन फ्रीडमन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)*
*१९०८:राधाबाई महादेव शेवडे-- कथाकार कादंबरीकार (मृत्यू:२६ आक्टोबर १९९९)*
*१९०७:दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार (मृत्यू: २९ जून १९६६)*
*१९०२:केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), (मृत्यू: २६ डिसेंबर १९८९)*
*१८८६:फ्रेड क्‍विम्बी--अमेरिकन अ‍ॅनिमेशनपट निर्माते(मृत्यू:१६ सप्टेंबर १९६५)*
*१८८०:धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्‍या व त्यांचे २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले.(मृत्यू: ८ आक्टोबर १९३६)*
*१८७२:लक्ष्मण रामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक (मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१)*
*१८३९:नागेश विनायक बापट-- चरित्रकार, कादंबरीकार(मृत्यू:मार्च १९०२)*
*१८००:फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ सप्टेंबर १८८२)*
*१७०४:गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती (मृत्यू: ४ जानेवारी १७५२)*

  *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 
 •••••••••••••••••••••••••••••••••      
*१९८०:मोहम्मद रफी – सुप्रसिद्ध पार्श्वगायक, पद्मश्री (जन्म: २४ डिसेंबर १९२४)*
*१९६८:शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक. (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)*
*१८७५:अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २९ डिसेंबर १८०८)*
*१८६५:जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 
*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_*     
                 *✍ संकलन ✍*
   *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*
मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       *दीर्घकथा - लक्ष्मी*

मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!

पाचवा भाग -------
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2875983935861695&id=100003503492582&mibextid=Nif5oz

कथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *औरंगाबाद विभागातील शिक्षकांची प्रेरणा परीक्षा संपन्न, परीक्षेला शिक्षकांचा अल्प प्रतिसाद*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *ISRO : अंतराळ क्षेत्रात भारताची नवी झेप, सिंगापूरच्या 7 ग्रहांचं केलं यशस्वी प्रक्षेपण*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *विद्यार्थ्यांचा आर्थिक बोझा वाढणार, हॉस्टेल-पीजीच्या शुल्कावर 12 टक्के जीएसटी आकारला जाणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *महात्मा गांधीजींचा अपमान सहन करणार नाही, संभाजी भिडे गुरुजींच्या वक्तव्याचा निषेध, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी स्वीकारणार टिळक पुरस्कार, पुणे मेट्रोच्या नव्या टप्प्यासह विविध योजनांचे करणार उद्घाटन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *ITR भरण्यासाठी आज शेवटचा दिवस, सहा कोटी लोकांनी दाखल केलं आयकर विवरण*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *वेस्ट विडिंजने हिशोब केला चुकता, भारताचा सहा विकेटने पराभव, मालिकेत 1-1 बरोबरी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*
📱9960358300
•••••••••••••••••••••••••••••••••••••
ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*पार्श्वगायक मोहम्मद रफ़ी*
मोहम्मद रफ़ी ( २४ डिसेंबर १९२४ – जुलै ३१, इ.स. १९८०) हे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते. त्यांना  भारतीय उपखंडातील महान आणि प्रभावी गायकांपैकी एक मानले जाते. मोहमद रफी त्यांच्या  आवाज, अष्टपैलुपणा आणि श्रेणीसाठी उल्लेखनीय होते; त्यांच्या गाण्यांमध्ये वेगवान पेपी नंबर ते देशभक्तीपर गीते, दर्द असणारी गाणी , अत्यंत रोमँटिक गाणी , कव्वाली ते गझल आणि भजनांमध्ये शास्त्रीय गाणी अशी विविधता होती. एखाद्या अभिनेत्याच्या व्यक्तिरेखेवर आणि शैलीनुसार आपला आवाज  काढण्याच्या क्षमतेसाठी, चित्रपटात स्क्रीनवर गाण्याचे लिप-सिंक करून दाखवणासाठी  प्रसिद्ध होते. त्यांनी हिंदी भाषा, उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलुगू भाषांमधून गाणी गायली, पण ते आपल्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांची गाणी भारतात, तसेच भारताच्या बाहेर स्थायिक असलेल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर, हेमंत कुमार मुखोपाध्याय आणि तलत मेहमूद यांच्याप्रमाणेच ते हिंदी चित्रपटांच्या १९५० ते १९८० च्या दशकांमधले एक प्रमुख पार्श्वगायक होते.

*संकलन*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
चारित्र्याचा विकास सुसंगतीने होतो तर, बुद्धीचा विकास एकांतात होतो.

*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
*प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*
📱9403046894
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••

१) कोणत्या देशांचा मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे ?
२) मादी मोर ( लांडोर ) वर्षातून कितीदा अंडी देते ?
३) भारतीय हिंदू देवी सरस्वतीचे वाहन कोणते ?
४) मोराचे वजन किती किलो असते ?
५) मोराला इंग्रजीत काय म्हणतात ?

*उत्तरे :-* १) भारत, श्रीलंका, म्यानमार ( राखाडी मोर )  २) दोनदा   ३) मोर   ४) ४ ते ६ किलो   ५) Peacock 
*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*
जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, 
ता. आमगाव, जि. गोंदिया 
 📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 बालासाहेब कच्छवे, श्रेणी 2 मुख्याध्यापक, जि. प. हा. चौफाळा, नांदेड
👤 मनोज बुंदेले, संपादक, विष्णुपुरी एक्स्प्रेस, धर्माबाद
👤 नागनाथ ईळेगावे, पदोन्नत मुख्याध्यापक, हदगाव
👤 कैलास श्याम गायकवाड
👤 दिलीप सोळंके
👤 प्रीतम नावंदीकर
👤 प्रशिक नंदूरकर, सहशिक्षक, हदगाव

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे।
 जयाचेनि योगें समाधान बाणे॥
 तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे।
 मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३९॥
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🕊🌎 ‼ *विचारधारा*‼
🕊🌎
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
नकारात्मक विचार जेवढ्या लवकर आपल्यात प्रवेश करतात तेवढयाच लवकर सकारात्मक विचार  का  बरं  आपल्यात प्रवेश करू शकत नाही. ..? हा सुद्धा  एक मोठा  भारी प्रश्न आहे. म्हणून तर.. कधी, कधी आपल्याला अशाच नकारात्मक विचारांमुळे  नको त्या ठिकाणी बळी पडावे लागते व शेवटी अनेक अडचणींचा सामना सुद्धा  आपल्यालाच करावा लागतो.  म्हणून पुन्हा अशी आपल्यावर  वेळ येऊ नये यासाठी जास्त नाही पण, थोडेतरी सकारात्मक विचार अंगिकारून आत्मसात करण्याची आवड आपल्या मनात निर्माण करणे गरजेचे आहे. 
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सौ.संगीता संतोष ठलाल 
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      *गाढवाचा गैरसमज*

एकदा, एका पाथरवटाने देवाच्या सुंदर मूर्ती बनवल्या. देवाच्या मूर्ती विकण्यासाठी बाजारात न्याव्यात म्हणून त्याने आपल्या गाढवावर त्या मूर्ती लादल्या व तो बाजाराच्या दिशेने निघाला. दगडात कोरलेल्या त्या देवांच्या मूर्ती पाहून येणारे सहजच हात जोडून मूर्तींना नमस्कार करीत. 
पण नमस्कार त्या देवाच्या मूर्तींना आहे हे त्या मूर्ख गाढवाला कळले नाही. त्याला वाटे जो तो आपल्यालाच नमस्कार करतोय. त्यामुळे स्वत:ला कोणी तरी मोठा समजून गाढव एक पाऊलही पुढे टाकीना. बराच वेळ पाथरवटाच्या लक्षात येईना. गाढव अडलंय का? आणि जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा हातातल्या काठीचा जोरदार फटका गाढवाला हाणत पाथरवटा म्हणाला, ""प्रत्येक माणूस तुला नमस्कार करतोय आणि तू कोणी महान आहेस असं तुला वाटतंय. पण मूर्खा, लोक नमस्कार त्या मूर्तींना करताहेत. आता चल नाही तर आणखी मार खाशील.' 

तात्पर्य : खोट्या अहंकाराने फजितीची वेळ येते.
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

30 डिसेंबर 2024 सोमवार

27 डिसेंबर 2024 शुक्रवार

दिनांक 02 जानेवारी 2024 मंगळवार