दिनांक 10 ऑगस्ट 2023 गुरुवार

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 10 ऑगस्ट 2023
💠 वार - गुरुवार
🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*_जागतिक सिंह दिवस_* 
•••••••••••••••••••••••••••••••••
 *_ या वर्षातील २२२ वा दिवस आहे_*  
•••••••••••••••••••••••••••••••• 
*_महत्त्वाच्या घटना:_*  
••••••••••••••••••••••••••••••
*१९९९:औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्‍या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.* 
*१९९९:’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणारा ’डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार’ डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर*
*१९९०:मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.*
*१९८८:दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंषशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.*
*१८२१:मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.*
*१८१०:’स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन’ ची स्थापना झाली.*

 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*  
••••••••••••••••••••••••••••••••• 
*१९९१:प्रदीप दत्ताराम बडदे-- कवी*  
*१९६५:ज्योत्स्ना प्रदीप राजपूत- कवयित्री* 
*१९६०:देवांग मेहता – भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष (मृत्यू: १२ जुलै २००१)*
*१९५५:प्रा.डॉ.कुमार शास्त्री-- लेखक, सुप्रसिद्ध वक्ते*  
*१९५१:अजित वाच्छानी-- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन वरील चरित्र अभिनेते(मृत्यू:२५ ऑगस्ट २००३)*
*१९३९:हरिहर बाबाराव खंडारे -- प्रसिद्ध कवी लेखक* 
*१९३४:डॉ.सुधीर नरहर रसाळ-- सुप्रसिद्ध समीक्षक,संपादक* 
*१९३०:मनोहर दत्तात्रेय आपटे -संस्थापक (मृत्यू:६ मे २००२)*
*१९२४: राम कृष्ण जोशी-- कथा,कादंबरीकार व बालसाहित्यिक* 
*१९२०:मधुसूदन बालकृष्ण वर्धे-- कथा, कादंबरी लेखन व संपादक* 
*१९१६:वसंत साठे --पटकथाकार व 'बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस'चे पार्टनर (मृत्यू:१२ जुलै १९९४)*
*१९१५:नारायण धबाडू पाटील -- कवी लेखक*
*१९१३:डॉ.अमृत माधव घाटगे – संस्कृत व प्राकृत विद्वान (मृत्यू: ८ मे २००३)*
*१९०२:नॉर्मा शिअरर – कॅनेडियन - अमेरिकन अभिनेत्री (मृत्यू: १२ जून १९८३)*
*१८९४:व्ही.व्ही.गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती,लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री (मृत्यू:२३ जून १९८०)*
*१८७४:हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २० आक्टोबर १९६४)*
*१८६०:पं.विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक (मृत्यू:१९ सप्टेंबर १९३६)*
*१८५५:’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (मृत्यू: १६ मार्च १९४६)*

 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 
•••••••••••••••••••••••••••••••••
*२०२१: डॉ.बालाजी तांबे-- आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ(जन्म:२८ जून १९४०)*    
*२०१२:सुरेश दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक (जन्म:११ आक्टोबर १९३२)*
*२००३:पं.गंगाधर वामन पिंपळखरे-- पुण्यातील जेष्ठ संगीत गुरू (जन्म:१२ जून १९११)*
*१९९७:नारायण पेडणेकर – कवी व नाट्यसमीक्षक* 
*१९९२:लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंग पाटील (SPP) थोरात -- संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते. (जन्म:१२ ऑगस्ट १९०६)*
*१९८६:जनरल अरुणकुमार वैद्य-- १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवल्याबद्दल त्यांना ’महावीरचक्र’ मिळाले होते. त्यांच्या लष्करप्रमुखपदाच्या काळातच ’ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ची कारवाई झाली होती. (जन्म:२७ जानेवारी १९२६)*
*१९८२:मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्‍यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली. (जन्म:१० एप्रिल १९२७)*
*१९५०:खेमचंद प्रकाश – संगीतकार (जन्म:१२ डिसेंबर १९०७)*
*१९४२:हुतात्मा शिरीषकुमार (जन्म: २८ डिसेंबर १९२६)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 
*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_*     
                 *✍ संकलन ✍*
   *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*
मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान
    *कमलादेवी चट्टोपाध्याय*
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काळातच अनेक सुधारणांची चळवळही सुरू झाली होती. कमलादेवी चट्टोपाध्याय या समाजसुधारक. पण समाज सुधारण्याची कामे करताना त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग नोंदवला.
तशा त्या मूळच्या नाटकातील कलाकार, पण स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोठं काम केलं. ब्रिटिशांनी अटक केलेल्या पहिल्या महिला म्हणजे कमलादेवी चटोपाध्याय.
स्त्रियांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर सुधारावा याकरिता त्यांनी काम केलं. स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक लघुउद्योग सुरू केले. अखिल भारतीय महिला परिषद त्यांनीच स्थापन केली.
कमला देवींनी महात्मा गांधीजींच्या १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात ही भाग घेतला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकातही त्यांनी भाग घेतला. त्या विधानसभेतील पहिल्या महिला उमेदवार होत्या.

संकलन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *'हा अविश्वास प्रस्ताव केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न', केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची लोकसभेत फटकेबाजी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *47 वर्षांनी रशियाकडून चांद्रमोहीम... 'लुना 25' यान अवकाशात झेपवणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *अखेर म्हाडाला 'मुहूर्त' सापडला! 4082 घरांसाठी 14 ऑगस्ट या दिवशी निघणार सोडत*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत! 17 लाख सरकारी-निमसरकारी कर्मचारीही उगारणार संपाचा बडगा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *कोल्हापूर करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी 70 लाखांचे दान*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *World Cup 2023: वर्ल्ड कपच्या 9 सामन्यांचं शेड्यूल बदललं, 05 ऑक्टोबर पासून होणार प्रारंभ*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*
📱9960358300
•••••••••••••••••••••••••••••••••••••
ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* 
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. 

*चंद्रपूर* 
 चंद्रपूरला आधी चांदा म्हणून ओळख होती. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असेही म्हणतात. या जिल्ह्यात कोळसा खाणी आणि चुन्याच्या खाणीही आहेत.

*संकलन*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
डोक्यावर जणू दुःखाचा मुकुट चढवून सुख मनुष्यापुढे उभे राहते. जो सुखाचे स्वागत करतो त्याने दुःखाचेही स्वागत केलेच पाहिजे.

➖स्वामी विवेकानंद

*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
*प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*
📱9403046894
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या बोधचिन्हावर कोणता पक्षी आहे ?
२) भारतात किंग फिशरच्या एकूण किती जाती आढळतात ?
३) 'शबल खंड्याचं विश्व' या मराठी पुस्तकाचे लेखक कोण ?
४) जंगलातला सर्वात मोठा किंगफिशर कोठे आढळतो ?
५) जगभरातल्या खंड्या प्रजातींची माहिती देणारा 'Kingfishar of the world' हा इंग्रजी ग्रंथ कोणी लिहिला ?

*उत्तरे :-* १) पांढऱ्या छातीचा ढीवर  ( खंड्या )   २) बारा   ३) अतुल धामणकर   ४) आफ्रिका ( ५० सेमी उंच )   ५) लेसी नोवल्स
*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*
जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, 
ता. आमगाव, जि. गोंदिया 
 📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 प्रा. अशोक मगरे, साहित्यिक
👤 हेमंत पापळे, शिक्षक, पुसद
👤 व्यंकटेश पुलकंठवार, नांदेड
👤 यशवर्धन पवार
👤 सचिन सुरबुलवाड
👤 संतोष येवतीकर, येवती
👤 गोविंदराव शिवशेट्टे
👤 रामदास देशमुख
👤 दिगंबरराव भीमराव सावंत
👤 नागराज आहिरे
👤 तुकाराम यनगंदलवार, पुणे
👤 गणेश मोहिते
👤 राहुल परसुरे
👤 शुभांगी पवार, साहित्यिक

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
सदा बोलण्यासारिखे चालताहे।
 अनेकीं सदा एक देवासि पाहे॥
 सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा।
 जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४९॥
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🕊🌎 ‼ *विचारधारा*‼
🕊🌎
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
पाणी नदीत  वाहत असते, साचलेले पाणी एखाद्या  डबक्यात सुद्धा असते. पण पाणी नुसते एकटेच असते का. ..? त्यामध्ये अनेक प्रकारचे विषारी, बिन विषारी जीवजंतू  तसेच ,काडी,कचरा सुद्धा असते. पण,ते पाण्यापेक्षा मोठे होऊ शकत नाही कारण पाणी हा नेहमीच निर्मळ असतो त्याला कितीही दूषित करण्याचा प्रयत्न केले तरी त्याच्या एवढी किंमत प्राप्त करू शकत नाही. म्हणून आपण सुद्धा या भूतलावावर जीवन जगत असतांना अशा  सर्वच जीवजंतू च्या संगतीत राहून त्याच पाण्यासारखे निर्मळ होऊन जगावे.कारण पाण्यानेच मळ धुवून काढता येते.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सौ.संगीता संतोष ठलाल 
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       *लालची कुत्रा*
एक कुत्रा होता. 
त्याला एकदा एक मांसाचा तुकडा मिळाला. 
तो तुकडा घेऊन तो नदी किनाऱ्याने जात होता. 
त्याला नदीत आपले प्रतिबिंब दिसले. 
त्याला तो दुसरा कुत्रा वाटला, आणि त्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा आपल्यापेक्षा भारी आहे असे वाटले. 
त्याने त्या पाण्यातल्या कुत्र्याशी भांडायला म्हणुन भुंकायला सुरुवात केली. 
भुंकायला तोंड उघडताच त्याच्या तोंडातील मांस नदीत पडले आणि वाहुन गेले. 
हताश होऊन तो कुत्रा आणि प्रतिबिंबातला कुत्रा फक्त एकमेकांकडे बघत बसले. 
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

30 डिसेंबर 2024 सोमवार

27 डिसेंबर 2024 शुक्रवार

दिनांक 02 जानेवारी 2024 मंगळवार