दिनांक 01 ऑगस्ट 2023 मंगळवार
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 01 ऑगस्ट 2023
💠 वार :- मंगळवार
🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*_ या वर्षातील २१३ वा दिवस आहे_*
••••••••••••••••••••••••••••••••
*_महत्त्वाच्या घटना:_*
••••••••••••••••••••••••••••••
*२००१:सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. ३ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले.*
*१९९६:कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते व निर्माते डॉ.राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर*
*१९९४:भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली जगातील अशा तर्हेची ही पहिलीच योजना आहे.*
*१९६०:इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.*
*१९४४:पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.*
*१९१४:पहिले महायुद्ध – जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.*
*१८७६:कोलोरॅडॊ अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.*
*१७७४:जोसेफ प्रिस्टले व कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.*
*_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*
•••••••••••••••••••••••••••••••••
*१९६७:डॉ.विक्रांत चंद्रकांत जाधव-- आयुर्वेद तज्ञ,लेखक*
*१९६५:पौलस सुगंध वाघमारे -- कवी,लेखक*
*१९६५:प्रा.डॉ.अनंत दादाराव राऊत-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक*
*१९६२:दगडू लोमटे--साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक*
*१९६१:डॉ.अच्युत बन-- प्रसिद्ध डॉक्टर तथा लेखक*
*१९५७:रामदास धोंडू गमरे-- कवी*
*१९५७:डॉ.विनायक तुमराम-- कवी, लेखक, समीक्षक*
*१९५६:शेषराव माधवराव मोहिते : ग्रामीण कादंबरीकार आणि शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते*
*१९५२:सदाशिव गोविंदराव पुंडपाळ - मराठी साहित्यिक*
*१९५१:वृक्ष मित्र प्रकाश काळे-- लेखक*
*१९५०: डॉ.गणेश नारायणदास देवी --भाषाशास्त्र तज्ज्ञ/भाषाशास्त्र अभ्यासक, लेखक*
*१९४४:नागोराव सोनकुसरे-- कवी*
*१९४४:दामोदर मावजो-- गोव्यातील एक लघुकथा लेखक, कादंबरीकार, समीक्षक त्यांना २०२१ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित*
*१९४४:प्रा.भगवान भाऊदेव काळे-- कादंबरीकार*
*१९४१:शंकर विठोबा विटणकर-- प्रसिद्ध कवी, लेखक*
*१९३६:जयश्री गोपाळराव घारपुरे-- लेखिका*
*१९३२:मनोहर म्हैसाळकर-- विदर्भ साहित्य संघाचे पूर्वअध्यक्ष आणि कुशल संघटक,साहित्य नाटकाचे जाणकार(मृत्यू:१४ ऑक्टोबर २०२२)*
*१९३२:महजबीन बानो ऊर्फ ’मीनाकुमारी’ – अभिनेत्री (मृत्यू:३१ मार्च १९७२)*
*१९२९:डॉ.विश्वास रघुनाथ कानडे -- लेखक*
*१९२९:श्री.ग.माजगांवकर-- पत्रकार, लेखक, प्रकाशक(मृत्यू :२० फेब्रुवारी १९९७)*
*१९२४:सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू (मृत्यू: १३ मार्च १९६७)*
*१९२०:’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – प्रसिद्ध लेखक,कवी व समाजसुधारक (मृत्यू: १८ जुलै १९६९)*
*१९१९:मोती बीए-- भोजपुरी आणि हिंदी भाषेतील प्रसिद्ध लेखक(मृत्यू:१८जानेवारी २००९)*
*१९१५:श्रीकृष्ण जनार्दन जोशी – कथाकार व कादंबरीकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू:१३जानेवारी १९८९)*
*१९१३:भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२)*
*१८९९:कमला नेहरू – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६)*
*१८८२:पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न (१९६१),(मृत्यू: १ जुलै १९६२)*
*१८३५:महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक.(मृत्यू:८ आक्टोबर १८८८ )*
*१७४४:जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ (मृत्यू: १८ डिसेंबर १८२९)*
*_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*
•••••••••••••••••••••••••••••••••
*२००८:हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य (जन्म: २३ मार्च १९१६)*
*२००८:अशोक मांकड – क्रिकेटपटू (जन्म: १२ आक्टोबर १९४६)*
*२००५:फहाद – सौदी अरेबियाचा राजा (जन्म: १६ मार्च १९२१)*
*१९९९:निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक.(जन्म: २३ नोव्हेंबर १८९७)*
*१९२०:लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी,भगव्दगीतेचे भाष्यकार (जन्म:२३ जुलै १८५६)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_*
*✍ संकलन ✍*
*श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*
मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*दीर्घकथा - लक्ष्मी*
मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!
सहावा भाग -------
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2880949455365143&id=100003503492582&mibextid=Nif5oz
कथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज टिळक पुरस्कारासह विविध प्रकल्पांच्या उद्घाटन-भूमिपूजनासाठी पुणे दौऱ्यावर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *पंतप्रधान दौरा निमित्ताने पुण्यातील मध्यवर्ती भागातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *मणिपूरच्या मुद्द्यावरून संसदेचं कामकाज स्थगित, विरोधकांचा पुन्हा गोंधळ*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *तेलंगणा सीएम के. चंद्रशेखर आज कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर; पक्षबांधणीसाठी घेणार राजकीय भेटीगाठी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार, दोन महिने मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज होणार तिसरा एकदिवसीय सामना*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱9960358300
•••••••••••••••••••••••••••••••••••••
ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे*
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी 01 ऑगस्ट 1920 रोजी मातंग समाजातील एका कुटुंबात झाला. औपचारिक शिक्षणाचा अभाव असूनही अण्णाभाऊ साठे यांनी मराठीतील 35 कादंबऱ्या, अनेक लेख लिहिले. त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे एक समाजसुधारक आणि लेखक होते. फकिरा या कांदबरीला 1961 मध्ये राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. अण्णाभाऊ साठेच्या लघुकथांचे 15 संग्रह आहेत. त्यांच्या बऱ्याच मोठ्या कथांची भारतीय आणि 27 नॉन-भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली आहे.
फक्त दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे अनुभवाच्या लेखणीने लोकशाहीर झाले. शोषितांचा आक्रोश शब्दातुन मांडनारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
*संकलन*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
ध्येयाचा नंदादीप अखंड तेवत ठेवा, म्हणजे कर्तृत्वाचा प्रकाश पडेल.
*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
*प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*
📱9403046894
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) मादी मोर ( लांडोर ) किती अंडे घालते ?
२) मोर हा पक्षी कोणत्या वर्गात मोडतो ?
३) मोराच्या एकूण जाती किती व कोणत्या ?
४) भारतामध्ये आढळणाऱ्या मोराचे शास्त्रीय नाव काय आहे ?
५) 'मोर' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणते ?
*उत्तरे :-* १) ३ ते ६ अंडी २) कुक्कुटवर्गीय पक्षी ३) तीन - भारतीय मोर, हिरवा मोर, आफ्रिकन मोर ४) पव्हो क्रिस्टेटस ५) मयूर, केकी, शिखी, नीलकंठ, केळभ
*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*
जि.प.व.प्राथ.शाळा भोसा,
ता. आमगाव, जि. गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*
👤 गोविंद पा. जाधव रोशनगावकर, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद
👤 मंगेश हानवत्ते, सहशिक्षक, नायगाव
👤 एकनाथ डुमणे, साहित्यिक, मुखेड
👤 डॉ. अच्युत बन, साहित्यिक, नांदेड
👤 राजू शेठ कोकुलवार, नांदेड
👤 साईनाथ पा. मोकलीकर, धर्माबाद
👤 विश्वनाथ चन्ने, कळमनुरी
👤 सतीश दरबस्तेवार, कुंडलवाडी
👤 बालाजी गायकवाड
👤 आनंदराव पेंडकर, ग्रामसेवक, येवती
👤 बंडू पा. मोरे, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद
👤 पवनकुमार भाले, धर्माबाद
👤 संजीवकुमार हामंद, सहशिक्षक, धर्माबाद
👤 मुखीत अहमद, सहशिक्षक, नांदेड
👤 शिवसांब गणाचार्य, सहशिक्षक नांदेड
👤 सौ.कुसुम कवठाळे मॅडम
कै.गं.पो.सब्बनवार मा.विद्यालय.
👤 रामदास पा. पांढरे
👤 शिनू दर्शनवाड, येवती
👤 यादव एकाळे
👤 दिलीप साळुंके
👤 नागेश टिपरे
*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
मना पाविजे सर्वही सूख जेथे।
अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥
विविकें कुडी कल्पना पालटिजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥४०॥
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🕊🌎 ‼ *विचारधारा*‼
🕊🌎
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
जेव्हा माणसातील माणुसकी सर्वात जास्त खालच्या थराला जाऊन पोहोचते त्यावेळी मानसन्मान, सत्य, खरे, चांगले, किंवा सर्वच अशा महत्वाच्या गोष्टींचा पूर्णपणे त्यांना विसर पडत असतो. म्हणून ते, नको त्या व्यर्थ गोष्टी करते वेळी किंवा मिळविण्यासाठी कशाचाही विचार करत नाही किंवा मागे, पुढे बघत नाही. जीवन जगताना कितीही दुःख, त्रास सहन करावा लागला तरी चालेल पण, जे सत्य आहे त्याचाच आपण स्वीकार करावा.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सौ.संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*कष्टाचे फळ*
एका गावात एक म्हातारा शेतकरी रहात होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना कष्ट करणे माहितच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर मजा करायचे. त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांचा संसार कसा चालणार? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचते व ते एके दिवशी आपल्या पाचही मुलांना जवळ बोलवितात व त्यांना सांगतात की आपल्या पूर्वजांनी शेतामधील एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक हंडा पुरलेला आहे.
मी गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा व धन काढून ते आपापसात वाटून घ्या. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या पाचही जणांनी सोन्याचा हंडा मिळविण्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही. मग त्यांनी विचार केला की एवढे शेत खणले आहे तर यात धान्य पेरावे म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले. त्यावेळेस पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. त्यांनी ते बाजारात जावून विकले व त्यांना भरपूर धन मिळाले.
गावाहून वडील आल्यानंतर त्या पाचही मुलांनी झालेला प्रकार वडीलांना सांगितला. तेव्हा ते बोलले, ‘मी तुम्हाला याच धनाबद्दल सांगत होतो जर तुम्ही अशीच मेहनत केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळत राहील.’
तात्पर्य - कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते.
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें