दिनांक 22 जुलै 2023 शनिवार

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 22 जुलै 2023
💠 वार - शनिवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
 *_ या वर्षातील २०३ वा दिवस आहे_*  
•••••••••••••••••••••••••••••••• 
*_महत्त्वाच्या घटना:_*  
••••••••••••••••••••••••••••••                                                                                                                                                                                                                                                                                                       
*२००१:जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मातब्बर जलतरणपटू इयान थॉर्प याने आपला पहिला विश्वविक्रम केला. त्याने ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ३ मिनिटे ४०.१७ सेकंद अशा विक्रमी वेळात जिंकली.*
*१९७७:चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.*
*१९४४:पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.*
*१९४२:वॉर्सा मधुन ज्यूंना हद्दपार करणे सुरू झाले.*
*१९३३:विली पोस्ट या वैमानिकाने एकटयाने ७ दिवस १८ तास व ४९ मिनिटे या विक्रमी वेळात विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.*
*१९३१:फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला. पुढे हे 'हॉटसन’ गोगटे पुण्याचे महापौर बनले.*
*१९०८:’देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा*

 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 
•••••••••••••••••••••••••••••••••        
*१९७०:देवेंद्र गंगाधर फडणवीस-- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री* 
*१९६९:संजय सुक्रीतदास बर्वे--  प्रसिद्ध लेखक* 
*१९६६:डॉ.नानासाहेब सूयवंशी-- लेखक, संपादक* 
*१९६६:विद्या शिशशेखर शिंदे-- लेखिका* 
*१९६५:सारंग शंतनू दर्शने-- वरिष्ठ सहसंपादक म.टा.मुंबई,लेखक,अनुवादक*
 *१९५९:अजित अनंतराव पवार-- महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री*
*१९५०:प्रल्हाद आवळसकर -- प्रसिद्ध लेखक* 
*१९३७:वसंत रांजणे–मध्यमगती गोलंदाज(मृत्यू: २२ डिसेंबर २०११)*
*१९३१: शकुंतला विष्णू गोगटे-- कथा व कादंबरी लेखिका (मृत्यू:५ नोव्हेंबर १९९१)*
*१९२५:गोविंद श्रीपाद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक(मृत्यू:२१ मार्च २०१७)*
*१९२३:मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – सुप्रसिद्ध पार्श्वगायक.(मृत्यू:२७ ऑगस्ट १९७६)*
*१९१८:गोपाळराव बळवंतराव कांबळे(जी. कांबळे)-- नावाजलेले मराठी चित्रकार(मृत्यू :२१ जुलै २००२)*
*१९०८:भालचंद्र मोरेश्वर गोरे-- लेखक, अनुवादक* 
*१८९८:पं. विनायकराव पटवर्धन – शास्त्रीय गायक (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५)*

 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 
•••••••••••••••••••••••••••••••••
*२०२२:अनंत यशवंत खरे उर्फ नंदा खरे-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक (जन्म:२आक्टोबर१९४६)* 
*२०१८:सुधा नरवणे-- आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रसिद्ध निवेदिका आणि मराठी लेखिका(जन्म:१४ सप्टेंबर १९३०)*
*२०१५:यशवंत कानिटकर-- मराठी भाषातज्‍ज्ञ, मुंबईतील सचिवालयात भाषासंचालक(जन्म:१२ डिसेंबर १९२१)*    
*१९९५:हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १४ नोव्हेंबर१९०४)*
*१९८४:गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ – साहित्यिक व प्रकाशक (जन्म: १९०९)*
*१९१८:इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (जन्म: २ डिसेंबर १८९८)*  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 
*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_*     
                 *✍ संकलन ✍*
   *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*
मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *कथा - आत्मनिर्भर*

स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!

सातवा भाग -------
https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7335079603175058/?mibextid=Nif5oz

कथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *मुंबईसह राज्यात सर्वदूर पावसाचं थैमान. अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी व शनिवारी शाळेला सुट्टी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *राज्यातील ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढेंची दीड महिन्यात पुन्हा बदली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *दिल्लीतील गरीब कुटुंबांना केजरीवाल सरकार देणार मोफत साखर; 2.80 लाखांहून अधिक लोकांना मिळणार लाभ*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *2031 पर्यंत देशाची अणुऊर्जा निर्मिती क्षमता 7480 मेगावॉटवरुन 22840 मेगावॉट होईल : मंत्री जितेंद्र सिंह*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *औरंगाबाद, सोलापूर जिल्ह्यात शंभर-पाचशेच्या बनावट नोटा चलनात आल्याने खळबळ*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *राज्य शासनाने क्रीडा प्रकारात योगासनाचा समावेश करावा; सत्यजीत तांबेची विधान परिषदेत मागणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *500 व्या सामन्यात कोहलीची विराट कामगिरी, कसोटीतील 29 वे शतक ठोकले*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*
📱9960358300
•••••••••••••••••••••••••••••••••••••
ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
📒 *तोंडाला दुर्गंधी का येते ?* 📒

ही विकृती म्हणजे काही जिवाणूंची अवकृपा आहे. हवा नसतानाही ज्यांची वाढ होऊ शकते, अशा घ्या ऍनेरोबिक जातीच्या जीवाणूंच्या करणीपायी तोंडात काही सल्फरयुक्त संयुगांची निर्मिती होते. ही संयुगं सहजासहजी हवेत उडून जाऊ शकतात. म्हणजेच बाष्पनशील असतात. यातलं एक संयुग म्हणजे हायड्रोजन सल्फाईड हा वायू असतो. कुजक्या अंड्यांमधूनही हाच वायू बाहेर पडतो. तसंच मिथाईल मरकॅप्टन नावाचं दुसरं एक संयुगही या दुर्गंधीला कारणीभूत असतं.
काही कारणांनी जेव्हा आपलं तोंड कोरडं पडतं तेव्हा अशा जीवाणूंच्या वाढीला पोषक वातावरण तयार होतं. त्यात अशा प्रसंगी तोंडातल्या लाळेच्या स्रावालाही आहोटी लागते. लाळ आपल्या जिभेवरचा, एकंदरीतच तोंडातला ओलावा राखण्यास मदत करते. शिवाय लाळेमधलं लायसोझाईम नावाचं विकर जीवाणूंना मारून टाकतं व त्यांच्या वाढीला त्यामुळे आळा बसतो; पण लाळेचा पाझर आटला की या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडत नाहीत. त्यामुळे या जीवाणूंचं फावतं. त्यांच्या करणीपायी तयार होणारी दुर्गंधीयुक्त रसायने तोंडात साचून राहतात.
आपल्या जीभेवरच्या वळकट्या, हिरड्यांच्या खालची जागा किंवा दातातल्या फटी या सहसा कोरड्या असतात. तसंच त्या थोड्याश्या अंधार्‍याही असतात. अशा जागी हे जिवाणु फोफावतात. त्यात जर दातांच्या फटीत अन्नाचे कण अडकून पडलेले असतील तर ते कुजतात. या जीवाणूंना ते पोषक ठरतात. त्यांच्या वाढीला मदतच करतात.
आपल्या आहाराचीही कधी कधी या जीवाणूंच्या वाढीला मदत होते. आहारातील काही पदार्थांच्या सेवनामुळे या ऍनेरोबिक जीवाणूंच्या वाढीला आणि बाष्पनशील आणि दुर्गंधीयुक्त संयुगांच्या निर्मितीला हातभार लावला जातो. कॉफी हा असाच एक पदार्थ आहे. त्याच्या अतिसेवनामुळे त्यातील आम्लधर्मीय पदार्थ तोंडातील ओलावा कमी करण्यास कारणीभूत होतात. वातावरण मग या दुर्गंधीकारक जीवाणूंच्या वाढीस योग्य होतं. शर्करायुक्त पदार्थ किंवा चुइंगमसारख्या पदार्थांचं जेव्हा या जिवाणूंकरवी विघटन होतं तेव्हाही ही बाष्पनशील संयुगं निर्माण केली जातात. मसालेदार पदार्थ किंवा कांदे खाल्ल्यावर त्यांच्या पचनापोटी निर्माण होणारे वायू रक्तामध्ये शोषले जाऊन उच्छवासाच्या वेळी फुप्फुसातून बाहेर फेकले जातात. त्या वेळीही तोंडातून दुर्गंधी आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अर्थात तो वास जरी काही जणांना सहन होत नसला तरी तो कुजक्या अंड्यासारखा नाक दाबून धरायला लावत नाही हे मात्र खरंच !

डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून
*संकलन*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. 

*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
*प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*
📱9403046894
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) चिपको आंदोलनाचे जनक कोण ?
२) निसर्गऋषी सुंदरलाल बहुगुणा यांनी कोणत्या आंदोलनातून वृक्ष संवर्धनासाठी चळवळ उभी केली ?
३) भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या देशाच्या घटनेच्या प्रस्तावनेने प्रेरित केली होती ?
४) सध्या भारताबाहेर कोणत्या देशात UPI प्रणालीचा वापर सुरू आहे ?
५) महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते ?

*उत्तरे :-* १) सुंदरलाल बहुगुणा, निसर्गऋषी   २) चिपको आंदोलन   ३) अमेरिका   ४) सिंगापूर   ५) मुख्य सचिव
*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*
जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, 
ता. आमगाव, जि. गोंदिया 
 📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 संजय कदम, पत्रकार, धर्माबाद
👤 महेश जाधव बिजापूर
👤 अनुराधा हवेलीकर पदमे
👤 श्रीनिवास वाघमारे
👤 संतोषकुमार दुरगुडे
👤 संतोष जाधव
👤 पद्माकर गोपाळराव मुळे
👤 अमोल बबनराव गायकवाड
👤 धनराज वाघ
👤 विश्वनाथ चित्रलवार
👤 दामोदर साळुंके
👤 सुमंत भांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी
👤 प्रल्हाद तुमेदवार, सहशिक्षक


*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥
 चिरंजीव केले जनी दास दोन्ही।
 नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३३॥
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🕊🌎 ‼ *विचारधारा*‼
🕊🌎
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
आपण बघितलेले एखादे स्वप्न  योगायोगाने  पूर्ण झाले की,आपला आनंद गगणात मावेनासा होतो व आपल्याला  तसेच स्वप्न बघण्याची वारंवार सवय लागत असते.एखादेवेळी ते,स्वप्न एखाद्या  वेळात पूर्ण झाले नाही तर , दु:ख होत असते. म्हणून नको त्या गोष्टीच्या नादी लागण्यापेक्षा आपल्याला  नेमकं काय करायचं आहे त्याकडेच लक्ष द्यायला पाहिजे. वारंवार स्वप्न  बघणे वाईट नाही. ते पूर्ण करण्याची जिद्द आपल्यात असायला पाहिजे. 
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सौ.संगीता संतोष ठलाल 
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
    *एकीचे बळ मोठे असते*

"वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खडयात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिल्लाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. 
परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्‍या एका मोठया खडयात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. 

तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

30 डिसेंबर 2024 सोमवार

27 डिसेंबर 2024 शुक्रवार

दिनांक 02 जानेवारी 2024 मंगळवार